100 वर्षे जुने दामोदर नाटय़गृह वाचवण्यासाठी कलाकार सरसावले; प्रशांत दामले यांचा उपोषणाचा इशारा

100 वर्षे जुने दामोदर नाटय़गृह वाचवण्यासाठी कलाकार सरसावले; प्रशांत दामले यांचा उपोषणाचा इशारा

100 वर्षे जुने ऐतिहासिक दामोदर नाटय़गृह पुनर्बांधणीच्या नावाखाली जमीनदोस्त करण्याचा घाट आहे. याविरोधात कलाकार मंडळी सरसावली आहेत. अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दामोदर नाटय़गृह वाचवण्यासाठी सर्व कलाकारांना घेऊन उपोषणाचा इशारा दिला.

सोशल सर्विस लीगचे दामोदर नाटय़गृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीसाठी बंद आहे. नाटय़गृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा जाण्याचा प्रस्ताव आहे. याविरोधात नाटय़कर्मींमध्ये नाराजी आहे. नाटय़गृह आहे त्याच जागी तब्बल 900 आसन क्षमतेचे असावे, अशी दामोदर नाटय़गृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाची मागणी आहे. अधिवेशनात नाटय़गृहाच्या तोडकामाला स्थगिती दिलेली असताना सोशल सर्विस लीगने मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केले आहे. याबद्दल नाटय़ परिषदेने आज तीव्र निषेध केला. ‘हा विषय सामोपचाराने सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे न होता स्थगितीला न जुमानता तोडकाम सुरू झाले आहे. याविरोधात सोशल सर्विस लीगला पत्र लिहिले जाणार आहे. जर त्यांनी ऐकले नाही तर नाटय़गृह बचावासाठी कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरणार,’ असे प्रशांत दामले म्हणाले.

काय आहेत मागण्या

शाळेचे बांधकाम आणि नाटय़गृहाचे बांधकाम एकाचवेळी सुरू करून संपवणे.
आधी नाटय़गृह 750 आसन क्षमतेचे होते. ते 900 आसन क्षमतेचे करावे.
वाढीव एफएसआय नाटय़गृहासाठीच वापरला जावा. त्यामध्ये 200 आसनांचे मिनी नाटय़गृह बांधावे.
दामोदर नाटय़गृहाच्या कर्मचाऱयांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर कीपर्सना पर्यायी रोजंदार द्यावा.
नव्या वास्तूत सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय/ तालमीची जागा असावी.
शाळा व नाटय़गृह यांचे एण्ट्री गेट वेगवेगळे असावे.
नाटय़गृह तळमजल्यावर असावे. नाटय़गृहाचे भाडे मर्यादित असावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;