गुणवत्तापूर्ण बांधकामांसाठी महारेराचा पुढाकार

गुणवत्तापूर्ण बांधकामांसाठी महारेराचा पुढाकार

विकासकांकडून घर, इमारतीच्या एकूणच प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत अनेक दावे केले जातात. प्रत्यक्षात मात्र ग्राहकाने घराचा ताबा घेतल्यानंतर हे दावे खोटे ठरतात. गृहनिर्माण प्रकल्पातील बांधकामाची गुणवत्ता राखली जावी यासाठी आता महारेराने पुढाकार घेतला आहे. प्रत्येक विकासकाला आता बांधकामाच्या गुणवत्तेबाबतच्या हमीचे स्वयंप्रमाणित घोषणापत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे. यासंबंधीचा मसुदा महारेराने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला असून याबाबतच्या सूचना आणि हरकती  suggestions.maharera@ gmail.com  या ई-मेलवर 23 मेपर्यंत नोंदविता येईल.

कुठल्याही गृहनिर्माण प्रकल्पाची गुणवत्ता त्याची संरचना संकल्पना, स्थिरता आणि चाचण्या, त्या प्रकल्पात वापरलेली सामग्री, प्रकल्प उभारणीत सहभागी कारागीरांची कुशलता, गुणवत्ता आणि अग्निसुरक्षा आदी बाबींवर ठरते. याबाबत विकासक प्रत्येक टप्प्यावर काटेकोरपणे काळजी घेत असेल तर प्रकल्पाची गुणवत्ता चांगली राहायला मदत होते. प्रत्येक विकासक आपला प्रकल्प सर्वच बाबतीत उत्तम आहे, असा दावा करीत असतो; परंतु येथून पुढे तशी हमी विकासकाने महारेरामार्फत  ग्राहकांना दरवर्षी द्यावी यासाठी त्यांनी काय काय करावे यासंदर्भातील परिपत्रक महारेराने जाहीर केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;