मुंबई, महाराष्ट्र लुटणाऱयांना पळवून लावा! आदित्य ठाकरे यांच्या मुलुंड आणि प्रभादेवी येथे झंझावाती सभा

मुंबई, महाराष्ट्र लुटणाऱयांना पळवून लावा! आदित्य ठाकरे यांच्या मुलुंड आणि प्रभादेवी येथे झंझावाती सभा

गेली दोन-अडीच वर्षे मुंबई – महाराष्ट्रावर अन्याय सुरू आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेचे हक्काचे मतदार, शिवसैनिक, महाराष्ट्र हिताचा मतदार वाट पाहत होते ते 20 मेची. ही वाट आपण अशासाठी पाहत होतो की, ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची वाट लावली, जे मुंबई, जे महाराष्ट्र लुटत होते त्यांना पळवून लावायचे आहे. केंद्रातले सरकार बदलायचे आहे आणि तो दिवस आता जवळ आला आहे, असे आवाहन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.

महाविकास आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे उमेदवार अनिल देसाई आणि उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारसभेत मुलुंड आणि प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, आमदार सुनील राऊत, उपनेते सचिन अहिर, उपनेत्या विशाखा राऊत, ज्योती ठाकरे, विभागप्रमुख सुरेश पाटील, काँग्रेसचे चरणसिंह सप्रा, रॉय मनी, सपाचे निसार खान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

गुजरातला 3 हजार कोटी, महाराष्ट्रात एक रुपया नाही

जेव्हा निसर्ग वादळ आले, तौक्ते वादळ आले, कोरोनाचा संकटकाळ होता त्यावेळी आज रोड शो करणारे भाजप नेते कुठे होते? निसर्ग वादळ आले, तौक्ते वादळ आले त्यावेळी महाविकास आघाडीने आपल्या तिजोरीतून नुकसानभरपाई दिली. या वादळांचा फटका महाराष्ट्राला बसला असताना पंतप्रधान मोदी गुजरातला विमानाने गेले ते महाराष्ट्रात आले नाहीत. गुजरातला 3 हजार कोटी नुकसानभरपाई दिली, पण महाराष्ट्राला एक रुपया दिला नाही. आज हा महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्याची वेळ आली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

ही लढाई शिवसेना विरुद्ध चिंधीचोर, गद्दार गँग अशी आहे

आपल्या डोक्यावर अवकाळी सरकार बसले आहे. ही लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध चिंधीचोर, शिवसेना विरुद्ध गद्दार गँग, शिवसेना विरुद्ध बापचोर, शिवसेना विरुद्ध पक्षचोर अशी आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आता तडजोड नाही

मुंबई, महाराष्ट्र लुटणाऱयांशी तडजोड नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जे बदलायला निघाले आहेत त्यांच्याशी तडजोड नाही. जे लोकशाही धोक्यात आणतात त्यांच्याशी तडजोड नाही. ही हुकूमशाही मानणारी भाजप आहे. त्यामुळे हे हुकूमशाही सरकार बदलण्याची वेळ आली आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

भाजपला मुंबई सर्वसामान्यांना परवडेनाशी करायची आहे!

लोकसभेची निवडणूक असली तरी मुंबईसाठी ही निवडणूक फार महत्त्वाची आहे. भाजपचे जे विचार आहेत ते मुंबई तोडण्याचे आहेत, पण त्याआधी भाजपला ही मुंबई कमजोर करायची आहे, पण तुम्ही आम्ही इथे आहोत म्हणून भाजप मुंबई आणि महाराष्ट्राचे तुकडे करू शकत नाही. त्यांचा प्लॅन बी आहे की, मुंबई सर्वसामान्यांना परवडणार नाही अशी करा, मुंबई महाग करा, इथले राहणीमान महाग करा. भाजपचे हे स्वप्न त्यांना साकारू द्यायचे आहे की नाही ते तुम्ही 20 मे रोजी दाखवून द्यायचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;