जूनअखेरपासून वांद्रे ते मरीन ड्राइव्ह 12 मिनिटांत

जूनअखेरपासून वांद्रे ते मरीन ड्राइव्ह 12 मिनिटांत

मुंबईकरांचा प्रवास वेगवान बनवणाऱया कोस्टल रोडचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून कोस्टल रोड आणि वांद्रे सी लिंक जोडणारा दुसरा महाकाय गर्डर आज पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनी यशस्वीरीत्या बसवण्यात आला. आता कोस्टल रोडचे शिल्लक काम वेगाने करण्यात येणार असून जूनअखेरपासून वांद्रे ते मरीन ड्राइव्ह हा पाऊण तासाचा प्रवास अवघ्या बारा मिनिटांत होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील आणि पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणारा ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून सुमारे 88 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी लिंक जोडला गेला आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची सांधणी. त्यासाठी पालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध तयारी केली.

असे झाले काम

 कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) 24 एप्रिल रोजी दुपारी 12.30 मिनिटांनी माझगाव डॉक येथून मार्गस्थ झाली आणि 25 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता वांद्रे-वरळी सागरी सेतूजवळ पोहोचली. शुक्रवारी पहाटे सव्वा तासात बो स्ट्रिंग आर्च गर्डर यशस्वीपणे बसवण्यात आला. महाकाय गर्डर स्थापित करण्याचे काम फ्रेट विंग्स प्रायव्हेट लिमिटेड पंपनीच्या सहकार्याने करण्यात आले.

 दुसऱया टप्प्यातील बो स्ट्रिंग आर्च गर्डर बुधवार, 15 मे रोजी पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनी बसवण्यात आला. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत. या प्रकल्पातील टप्पा असलेल्या 136 मीटरच्या सर्वात मोठय़ा बो स्ट्रिंग आर्च गर्डरची बांधणी रायगड जिह्यातील न्हावा येथे करण्यात आली. हा महाकाय गर्डर न्हावा जेट्टीवरून हा गर्डर बार्जमध्ये टाकून वरळी येथे आणला गेला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;