स्मृती इराणींची ऑनस्क्रीन सून लग्नानंतर 18 वर्षांनी बनली आई, बाळासाठी बरेच प्रयत्न केलेलं, पण…
बाळासाठी प्रचंड तरसलेली ही अभिनेत्री. लग्नानंतर 18 वर्षांनी मिळालं आई बनण्याच सुख. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये या अभिनेत्रीने काम केलय.
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिल्पा सकलानीच वयाच्या 21 व्या वर्षी लग्न केलं. लहानपणी तिने हे मेनिफेस्ट केलेलं. जे सत्यात उतरलं.
लग्नानंतर मातृत्वाच सुख तिला 18 वर्षांनी मिळालं. शिल्पा सकलानीने रुबीना दिलैकच्या पॉडकास्टमध्ये आपल्या प्रेग्नेंसी जर्नीबद्दल सांगितलं.
लग्नानंतर चार वर्षांनी तिला बाळ हवं होतं. तिने देवाकडे मुलगी मागितलेली. अपूर्व अग्निहोत्री सारखी दिसणारी मुलगी तिला हवी होती.
तिला आई बनण्यासाठी 18 वर्ष प्रतिक्षा करावी लागली. या दरम्यान कंसीव करण्याचा तिने बराच प्रयत्न केला. पण यश मिळालं नाही.
शिल्पा म्हणते, माझा कर्मावर विश्वास आहे. मूल थोडं लेट झालं 18 वर्षांनी. माझी मुलगी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार आहे. ती आता 17 महिन्यांची आहे.
मी या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे. निराशेचा एक छोटा काळ होता. कारण मूल होण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो. पण काही होत नव्हतं, असं तिने सांगितलं.
शिल्पाला देवावर विश्वास होता. एक दिवस मूल होईल. ती आता एका मुलीची आई आहे. लग्नानंतर 18 वर्षांनी हे सुख मिळालय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.









Comment List