बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा इरीगेशन बंगला परिसरात बिबट्याने तीन शेळ्या आणि एका बोकडाचा फडशा पाडला आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर घटना आज मंगळवारी (15 मे 2024) मध्यराञी घडली. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल इरीगेशन बंगल्या जवळ असणाऱ्या विरेश अंबादास डावखर यांच्या वस्तीवर असणाऱ्या शेळ्यांवर मध्यराञीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तीन शेळ्या व एका बोकडाचा बिबट्याने फडशा पाडला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेती माहिती मिळताच घटनास्थळी वनाधिकारी युवराज पाचरणे यांच्या अधिपत्याखाली राजु रायकर, बाबासाहेब सिनारे आदींनी घटनास्थळी भेट देवून मृत शेळ्यांचा पंचनामा केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;