सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय? विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल

सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय? विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल

मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशिलपणा संपला आहे. खरंतर ही घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर टिकास्त्र डागले आहे. त्याचबरोबर  होर्डींग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजप काढत आहे. भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय? असा संतप्त सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
मुंबई येथील गांधी भवन काँग्रेस पक्ष कार्यालयात बुधवारी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  वडेट्टीवार म्हणाले की, बुधवारी मुंबईत मोदींचा रोड शो होतोय आणि राज्यात 24 वी सभा घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा एखादा नेता एवढ्या सभा घेत नाही. तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की, राहुल गांधी यांची मोदींना भिती वाटते. महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार आहे. त्यामुळे भाजपा घाबरली आहे. नाशिकमध्ये पंतप्रधानांनी सभा घेतली पण कांदा प्रश्नावर ब्र सुद्धा काढला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची या राज्यात पिळवणूक केली जात आहे. ही वस्तुस्थिती आहे.
सध्या मोदींची तळी उचलण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. हा जिरेटोप फक्त शिवाजी महाराजांच्या डोक्यावर शोभतो. महाराष्ट्रच्या अस्मितेची जाण पटेलांना नसावी म्हणून हे कृत्य केले आहे. प्रफुल पटेल यांचे दहशवाद्यांशी संबंध होते. असे भाजपाने आरोप केले होते. त्यांच्या मागे ईडी लावली होती. तरी देखील त्यांच्या हातून जिरेटोप कसा परिधान केला,असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. आता जिरेटोप घातल्यानंतर प्रफुल पटेल माफी मागणार आहेत का? असा सवाल करत फक्त ट्वीट करून तुमचा उद्देश सफल होणार नाही असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
होर्डींग दुर्घटनेला मुंबई महापालिका आणि सरकार जबाबदार आहे. जी क्रेन घटनास्थळी लवकर जायला हवी होती ती मंगळवारी गेली. आता महायुतीचे पाप लपविण्यासाठी भावेश भिडे नावाच्या व्यक्तीचे फोटो समोर आणले आहेत. कोणाचे फोटो कोणासोबत असू शकतात त्यामुळे काही फरक पडणार नाही. प्रतिमा मलिन करण्याचा भाजपाचा जुना डाव आहे. पण जनता आता भाजपाला ओळखून आहे. या सगळ्या घटनेची उचस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमच्याकडून केली असल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;