सासू शर्मिलासोबत करीनाचा खास व्हिडीओ; नेटकरी म्हणाले ‘ऐश्वर्या-जया बच्चन कधीच करू शकणार नाहीत’

सासू शर्मिलासोबत करीनाचा खास व्हिडीओ; नेटकरी म्हणाले ‘ऐश्वर्या-जया बच्चन कधीच करू शकणार नाहीत’

अभिनेत्री करीना कपूर आणि तिची सासू शर्मिला टागोर यांच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका होम डेकॉरच्या ब्रँडसाठी या सासू-सुनेनं एकत्र जाहिरातीत काम केलंय. त्याचा व्हिडीओ करीनाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जवळपास एक मिनिटाच्या या जाहिरातीत करीना आणि शर्मिला यांच्यातील गोड नात्याची झलक पहायला मिळतेय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ज्याप्रकारे करीना आणि शर्मिला यांनी एकत्र जाहिरात केली, तसं ऐश्वर्या राय आणि जया बच्चन कधीच करू शकणार नाही, असंही काहींनी म्हटलंय.

विशेष म्हणजे ही जाहिरात पतौडी पॅलेसमध्येच शूट करण्यात आली आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला शर्मिला आणि करीना हे बाथरोब घालून रुममधील डेकॉर प्रॉडक्ट्सची पाहणी करतात. त्यानंतर दोघं ब्रेकफास्ट टेबलवर एकत्र येतात आणि एकमेकींचं कौतुक करतात. ‘राणीसोबत डान्स.. रिअल ते रिल आयुष्य’, असं कॅप्शन देत करीनाने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. करीनाने हा व्हिडीओ पोस्ट करताच त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी या सासू-सुनेच्या जोडीचं कौतुक केलं आहे. दोघींना एकत्र पाहून खूपच आनंद झाल्याचंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

‘कॉफी विथ करण 8’ या चॅट शोदरम्यान जेव्हा शर्मिला टागोर यांनी सैफ अली खानसोबत हजेरी लावली होती, तेव्हा त्यांनी सून करीना कपूरची एक क्लिप दाखवण्यात आली होती. त्यात ती सासू शर्मिला टागोर यांच्याविषयी बोलताना दिसली. “मी सैफला भेटल्यापासूनच त्यांना अम्मा म्हणून हाक मारू लागले. कारण त्यांच्यासोबत ते कनेक्शन सहज जुळलं होतं. त्या खूप प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या आहेत. त्या माझ्याकडे सून म्हणून नाही तर मुलगी म्हणून पाहतात. सोहा आणि सबा यांच्यासारखीच मी त्यांची मुलगी आहे, असं त्या वागतात. त्यामुळे मला कधीच परकेपणा जाणवला नाही”, असं ती म्हणाली होती.

याच शोमध्ये शर्मिला यांनीसुद्धा करीनाचं कौतुक केलं होतं. “ती नेहमी जेवणाचं टेबल खूप सुंदररित्या सजवते. त्यानंतर ती मला विचारते, अम्मा तुम्हाला हे खायला आवडेल का? तुम्हाला ते खायला आवडेल का? त्यामुळे आमच्यात चांगली बाँडिग झाली. तिला डिनर नेहमी वेळेवर करायला आवडतं. त्यामुळे सर्वकाही खूप छान आहे. आयुष्याच्या बाबतीत खूप स्पष्टता आहे”, असं त्या म्हणाल्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;