तुम्हाला आवडत नसेल तर..; ‘ॲनिमल’वर होणाऱ्या टीकेबाबत मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया

तुम्हाला आवडत नसेल तर..; ‘ॲनिमल’वर होणाऱ्या टीकेबाबत मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. तगडा गल्ला जमवण्यात जरी हा चित्रपट यशस्वी ठरला असला तरी सोशल मीडियावर अनेकांनी त्यातील सीन्स, गाणी, डायलॉग्स यांवरून तीव्र आक्षेप नोंदवला होता. रणबीर कपूरच्या या चित्रपटावर आता अभिनेता मनोज वाजपेयीने मत मांडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मनोजने ‘ॲनिमल’ हा चित्रपट मनोरंजक असल्याचं म्हटलंय. त्याचप्रमाणे त्याने ‘कांतारा’, ‘RRR’ आणि ‘आर्टिकल 370’ या चित्रपटांचंही कौतुक केलंय.

मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत मनोज म्हणाला, “माझे विचार याबाबत खूप स्पष्ट आहेत. जर अनेक लोकांना एखादा चित्रपट आवडत नसेल किंवा पटत नसेल तर त्यात चुकीचं काय आहे? चित्रपट प्रदर्शित होतो, त्याचा व्यवसाय होतो आणि गोष्टी पुढे सरकतात. मिळवलेला पैसा निर्मात्यांच्या खिशात जातो. जर तुम्हाला तो चित्रपट पहायला नसेल तर पाहू नका. जर एखाद्या गोष्टीशी तुम्ही सहमत नसाल, तर ते न बघणंच ठीक असतं. पण त्या चित्रपटाच्या मार्गात अडथळे निर्माण करू नका. असं करून तुम्ही फक्त चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देत आहात. जर तुमच्या कामात दुसऱ्या व्यक्तीने असाच अडथळा आणला तर? बंदीची मागणी न करता किंवा आंदोलनं न करता चर्चा झाली पाहिजे.”

वादावर रणबीर काय म्हणाला होता?

‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी आणि बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘ॲनिमल’ हा चित्रपट स्त्रीविरोधी आणि अत्यंत हिंसक असल्याची टीका काही नेटकऱ्यांनी केली होती. 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल 900 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. चित्रपटावर झालेल्या टीकेबद्दल रणबीरनेही प्रतिक्रिया दिली होती. “या चित्रपटाबद्दल काही जणांना समस्या होती पण माझ्या मते जे प्रेम, यश आणि बॉक्स ऑफिसचे आकडे या चित्रपटाला मिळाले आहेत, त्यावरून हे सिद्ध होतंय की चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमापेक्षा अधिक महत्त्वाचं काहीच नाही. चित्रपटापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही,” असं तो चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये म्हणाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;