‘रॉयलओक’चा महाराष्ट्रातील फर्निचर बाजारपेठेत प्रवेश, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात आणखी स्टोअर उघडण्याचे उद्दिष्ट

‘रॉयलओक’चा महाराष्ट्रातील फर्निचर बाजारपेठेत प्रवेश, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात आणखी स्टोअर उघडण्याचे उद्दिष्ट

फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या रॉयलओक फर्निचरने महाराष्ट्रातील फर्निचर बाजारपेठेत आता प्रवेश केला आहे. दर्जेदार फर्निचरसाठी विश्वासार्हता लक्षात घेता गेल्‍या तीन वर्षांमध्‍ये 50 हजारहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे, ज्‍यामधून दर्जा व उत्तम फर्निचरबाबतची कटिबद्धता दिसून येते. रॉयलओक मार्केटमध्ये सतत नाविन्‍यता आणत आहे. आता लवकरच रॉयलओक फर्निचर मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात आपले स्टोअर खुले करणार आहे.

रॉयलओक फर्निचरचे संस्‍थापक व अध्‍यक्ष विजय सुब्रमणियन म्हणाले की, आम्‍ही ग्राहकांना फर्निचर खरेदी करण्‍याच्‍या योग्‍य मार्गाबाबत माहिती देण्‍यासाठी उपक्रम राबवत आहोत. आम्‍ही ‘ओम्‍नी-चॅनेल एक्‍स्‍पेरिअन्‍स’मध्‍ये देखील वाढ करत आहोत, ज्‍यामध्‍ये मुंबई, पुणे व नागपूर येथे प्रत्‍यक्ष स्‍टोअरमध्‍ये सल्‍लामसलतीसह ऑनलाइन ब्राऊजिंगचा समावेश आहे. तसेच, आम्‍ही मुंबईतील सुसंगत अपार्टमेंट्ससाठी अनुकूल असे स्‍पेस-सेव्हिंग फर्निचर सोल्‍यूशन्‍स सादर करत आहोत. आम्‍ही महाराष्‍ट्रातील दीर्घकालीन विकासाप्रती कटिबद्ध आहोत. 2025 पर्यंत उत्तर महाराष्‍ट्रात 30 नवीन स्‍टोअर्स आणि मुंबई महानगर क्षेत्रात 20 नवीन स्‍टोअर्ससह आमची उपस्थिती वाढवण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. महाराष्‍ट्रात रिअल इस्‍टेट सर्वात महागडे क्षेत्र असल्‍यामुळे आम्‍ही कंपनीच्‍या मानकांशी बांधील राहत कार्यसंचालनाची अंमलबजावणी करू शकतो अशा पद्धतीने विस्‍तार करण्‍याची योजना आखली आहे. यामध्‍ये राज्‍यभरात वेळेवर डिलिव्‍हरींच्‍या खात्रीसाठी प्रबळ वितरण नेटवर्क्‍स स्‍थापित करण्‍याचा समावेश असल्याचे म्हणाले.

विजय सुब्रमणियन म्हणाले की, 2025 पर्यंत दर्जेदार फर्निचरसाठी उच्‍च मागणी असलेल्‍या क्षेत्रांमध्‍ये 50 नवीन स्‍टोअर्स सुरू करणार आहोत. लोकेशन निवडण्‍यावर सर्वाधिक प्रभाव टाकलेले घटक आहेत निवासी क्षेत्रांपासून जवळचे अंतर, सुलभ उपलब्‍धता आणि स्‍थानिक ग्राहक पसंतीबाबत प्रबळ माहिती. आंतरराष्‍ट्रीय कलेक्‍शनच्‍या माध्‍यमातून ग्राहकांची जीवनशैली उत्‍साहित करण्‍यासाठी ठाणे, नाशिक व छत्रपती संभाजीनगर यांसारख्‍या शहरांमध्‍ये नवीन स्‍टोअर्स सुरू करणार आहोत. आम्‍ही आमच्‍या स्टोअर्सना इटालियन, मलेशियन, अमेरिकन व एम्‍परर यांसारख्‍या विविध आंतरराष्‍ट्रीय कलेक्‍शन्‍सवर आधारित चार फ्लोअर्समध्‍ये विभागले आहे. ग्राहकांना त्‍या विशिष्‍ट देशामधील खरेदीचा अनुभव देण्‍यासाठी ही संकल्‍पना सुरू करण्‍यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;