जिरेटोप मोदींना घातल्याने प्रफुल पटेलांविरोधात संताप…नंतर केली सारवासारव

जिरेटोप मोदींना घातल्याने प्रफुल पटेलांविरोधात संताप…नंतर केली सारवासारव

अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घातल्याने शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी विरोधकांनी आणि शिवप्रेमींनी प्रफुल पटेलांवर टीका करत तीव्र संताप व्यक्त केला होता. जिरेटोप ही छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख असून अनेकांच्या भावना त्याच्याशी जुळल्या आहेत. छत्रपतींच्या प्रतीमेत असणार जिरेटोप प्रफुल पटेल यांनी मोदींच्या डोक्यावर चढवला होता. याचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर छत्रपती शिवराय यांचा अवमान झाल्याने भावना दुखावल्या गेल्याने पटेल यांच्याविरोधात सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. आता प्रफुल पटेल यांनी यावर सारवासराव करत यापुढे काळजी घेऊ असे म्हटले आहे.

या घटनेबाबत सारवासरव करताना प्रफुल पटेल यांची एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ,असे त्यांनी म्हटले आहे.

जिरेटोप हातात देत एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जातो. मात्र, प्रफुल पटेल यांनी जिरेटोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर घालत महाराजांचा अवमान केला आहे. महायुती दिल्लीच्या तख्तापुढे इतकी लाचार झाली आहे की, महाराष्ट्राची प्रतिमाच खड्ड्यात घालण्याचे काम हे लोक करत आहेत. महाराजांचा अवमान करणाऱ्या या महायुतीला, भाजपला धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता शांत बसणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;