माधुरी दीक्षितसोबत इंटिमेट सीन करताना अभिनेत्याचा सुटला ताबा; ‘धकधक गर्ल’ला आजही होतो पश्चाताप

माधुरी दीक्षितसोबत इंटिमेट सीन करताना अभिनेत्याचा सुटला ताबा; ‘धकधक गर्ल’ला आजही होतो पश्चाताप

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, छोट्या पडद्यावर मात्र कायम सक्रिय आहे. गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्री अनेक शोमध्ये परीक्षकाची भूमिका पार पाडत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा माधुरी हिला एका सीनचा पश्चाताप वाटू लागला होता. वयाच्या 20 व्या वर्षी अभिनेत्री स्वतःपेक्षा 20 वर्ष मोठ्या अभिनेत्यासोबत किसिंग सीन शूट केले होतं. पण तेव्हा इंटिमेट सीन शुट करताना अभिनेत्याचा ताबा सुटला… ज्याचा पश्चाताप आजही अभिनेत्रीला होतो.

सध्या ज्या सिनेमाची चर्चा रंगत आहे, त्या सिनेमाचं नाव ‘दयावान’ असं आहे. ‘दयावान’ सिनेमात माधुरी दीक्षित हिने अभिनेते विनोद खन्ना यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. तेव्हा विनोद खन्ना अभिनेत्रीपेक्षा 20 वर्ष मोठे होते. सिनेमात दोघांवर किसिंग सीन शुट करण्यात आला होता.

किसिंग सीन शुट होत असताना अभिनेत्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. यावर माधुरीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला होता, ‘माझ्या कुटुंबाचा इंडस्ट्रीसोबत काहीही संबंध नव्हता. म्हणून मला ठावूक नव्हतं इंडस्ट्रीमध्ये कसं काम चालतं. त्यामुळे ‘दयावान’ सिनेमात मला किसिंग सीनसाठी नकार देता आला नाही.’

‘दयावान’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर माधुरीला स्वतःचीच लाज वाटू लागली होती. ज्यामुळे अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर किसिंग सीन करण्यास नकार दिला. आता मागे वळून पाहते तेव्हा वाटतं आता याबद्दल मौन बाळगणं योग्य ठरेल..’ आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

माधुरी हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, ‘दिल’, ‘खलनायक’, ‘साजन’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन’ आणि ‘दिल तो पागल है’ यांसारख्या हीट सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. माधुरी हिने तिच्या आतापर्यंतच्या करियरमध्ये जवळपास 70 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे.

सोशल मीडियावर देखील माधुरी कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर स्वतःचे आणि पती, मुलांसोबत देखील फोटो पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;