नवाब तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…, सैफ अली खान – करीना कपूर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

नवाब तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…, सैफ अली खान – करीना कपूर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

बॉलिवूडच्या पॉपुलर कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर… अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आणि लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सैफ आणि करीना यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी फार कमी लोकांच्या उपस्थितीत 2012 मध्ये लग्न केलं. पण आता लग्नाच्या 13 वर्षांनंतर करीना आणि सैफ यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सांगायचं झालं तर, नुकताच, सैफ आणि करीना यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. ज्यामध्ये दोघे बिल्डिंग खाली लिपलॉक करताना दिसले. ज्यामुळे दोघांना नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केलं. पण आता सैफ आणि करीना यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.

सैफ आणि करीना यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामागे देखील मोठं कारण आहे. सोशल मीडियावर सैफ याचे काही फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामुळे सैफ आणि करीना यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. नुकताच सैफ याला विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. तेव्हा सैफ याच्या टॅटूने सर्वांचं लक्ष वेधलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

 

सैफ याच्या हातावर पत्नी करीना हिच्या नावाचा टॅटू होता. पण आता अभिनेत्याच्या हातावर दुसराच टॅटू दिसत आहे. अभिनेत्याच्या टॅटूचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नेटकरी देखील व्हायरल होत असलेल्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आणखी एका लग्नाच्या तयारीत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नवाब सैफ तिसरी बेगम आणण्याच्या तयारीत…’, तिसरी नेटकरी म्हणाला, ‘घटस्फोट होणार पक्क आहे…’, चौथा नेटकरी म्हणतात, ‘आता टॅटू बोलला आहे, काही दिवसांनी पत्नी बदलेल…’, अन्य नेटकरी म्हणाला, ‘सैफ हॅट्रिक मारण्यासाठी तयार आहे…’ सध्या सर्वत्र फक्ता आणि फक्त सैफ – करीना यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

सैफ अली खान – करीना कपूर

अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट झाल्याच्या अनेक वर्षांनंतर सैफने अभिनेत्री करीना हिच्यासोबत लग्न केलं. खास पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहे. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;