‘कान्स’च्या रेड कार्पेटवर झळकली ‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्री; नेटकरी म्हणाले ‘जणू झेंडूचं फुलच’
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत भूमिकेत साकारलेली अभिनेत्री दिप्ती साधवानी हिने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024'च्या रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधलं आहे. दिप्तीने 'हास्यसम्राट' या कॉमेडी शोचं सूत्रसंचालनसुद्धा केलं होतं.
कान्सच्या रेड कार्पेट लूकसाठी दिप्तीने नारंगी रंगाच्या ड्रेसची निवड केली. या ड्रेसमधील तिचा लूक पाहून दिप्ती जणू झेंडूच्या फुलासारखीच गोड दिसतेय, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. तिने इन्स्टाग्रावर हे फोटो पोस्ट केले असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
दिप्तीच्या या गाऊनला सर्वांत लांब 'ट्रेल' असल्याचं तिने म्हटलंय. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने याबद्दलची माहिती दिली आहे. दिप्तीचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
दिप्तीने 'मिस नॉर्थ इंडिया'चा किताब जिंकला होता. त्यानंतर 'मिस इंडिया'च्या अंतिम फेरीपर्यंत ती पोहोचली होती. दिप्तीने मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम केलंय. 'नजर हटी दुर्घटना घटी' आणि 'रॉक बँड पार्टी' या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत.
टीव्ही आणि चित्रपटांशिवाय दिप्तीने म्युझिक इंडस्ट्रीतही नाव कमावलं आहे. 'हरयाणा रोडवे' आणि 'लल्ला लल्ला लोरी' ही तिची गाणी खूप गाजली आहेत. गेल्या काही वर्षात दिप्तीची 12 गाणी रिलीज झाली आहेत. त्याचसोबत ती लाइव्ह शोजसुद्धा करते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List