‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये मोठा ट्विस्ट; वाढदिवशी अमोलला मिळेल का बाबांची भेट?
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथानक अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनचं नातं फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे. जसजशी मालिका पुढे सरकतेय तसतशी त्या दोघांची मैत्री मजबूत होत आहे.
अमोलशी बोलल्याने अर्जुनच्या मनातील कडवटपणा कमी होऊ लागला आहे आणि तो अप्पीला एक संधी देण्याचं ठरवतो. त्यासाठी अर्जुन अप्पीच्या घरी भेटीला गेला असता त्याला तिकडे आलेले सरकार आणि रुक्मिणी दिसतात. हे पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते.
अप्पी अजूनही तशीच आहे हे कळताच तो मागे फिरतो. इकडे अमोलचा वाढदिवस जवळ आला आहे आणि अप्पीची इच्छा आहे की अर्जुनला अमोलच्या वाढदिवसाला बोलवावं. ती त्यासाठी तयारी करते आणि गायतोंडेला अर्जुनची माहिती काढायला सांगते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List