Lok Sabha Elections 2024 : 7 किलो सोने, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी, आलिशान गाड्या अन् बंगले, कंगना कोट्यवधींची मालकीन

Lok Sabha Elections 2024 : 7 किलो सोने, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी, आलिशान गाड्या अन् बंगले, कंगना कोट्यवधींची मालकीन

लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. त्याचवेळी देशातील इतर टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात बॉलीवूड स्टारही उतरले आहेत. ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनु’ यासारखे शानदार चित्रपट देणारी कंगना राणावत (Kangana Ranaut) निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या कंगनाने राजकारणात एन्ट्री केली आहे. मंगळवारी तिने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha Seat) मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून (BJP) उमेदवारी अर्ज दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत संपत्तीचे माहिती देणारे प्रतिज्ञापत्र तिने जोडले आहे.

कंगना केवळ बारावी उत्तीर्ण

कंगना राणावत मुळची हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातीलच आहे. तिचा जन्म 23 मार्च 1987 रोजी मंडी जिल्ह्यात झाला. कंगना केवळ बारावी उत्तीर्ण आहे. तिने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार तिच्याकडे 90 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. तिच्याकडे दोन लाखांची रोकड आहे. सर्व बँक खाते, शेअर, ज्वेलरी मिळून जंगम मालमत्ता 28 कोटी 73 लाख 44 हजार 239 रुपये आहे. स्थावर मालमत्ता 62 कोटी 92 लाख 87 हजार रुपये आहे. तिच्यावर 17 कोटी 38 लाख रुपये कर्जसुद्धा आहे.

सोने, चांदी अन् हिरे

कंगना राणावतकडे 6 किलो 700 ग्रॅम सोने आणि दागिने आहेत. या सोन्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये आहे. तसेच 60 किलो चांदी आहे. चांदीची किंमत 50 लाख रुपये आहे. तिच्याकडे कोट्यवधी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आहेत. त्यांची किंमत 3 कोटींहून अधिक आहे.

महागड्या गाड्यांची आवड

कंगनाला महागड्या आणि आलिशान कारचीही आवड आहे. तिच्याकडे एकापेक्षा एक आलिशान गाड्या आहेत. तिने दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गाड्यांचा उल्लेख केला आहे. त्यात एक BMW 7-Series आहे आणि दुसरी Mercedes Benz GLE SUV आहे. या दोन्ही कारची एकूण किंमत 1.56 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

50 LIC पॉलिसी

कंगना राणावत हिच्या पाच, दहा नाही तर 50 एलआयसी पॉलिसी आहेत. या सर्व पॉलिसी एकाच दिवशी 4 जून 2008 काढल्या होत्या. तिची शेअरमध्ये चांगली गुंतवणूक आहे. तिच्याकडे मनिकर्णिका फिल्म्स प्राइवेट लिमिटेड के 9999 शेअर आहे. तिने 1.20 पेक्षा जास्त रक्कम शेअरमध्ये गुंतवली आहे.

मुंबई अन् मनालीत शानदार बंगला

कंगानाचा मुंबईत फ्लॅट मनालीमध्ये शानदार बंगला आहे. मनालीत घराची किंमत 25 कोटी रुपये आहे. मुंबईत
पाच बेडरूमचा फ्लॅट आहे. त्याची किंमत 15 ते 20 कोटी आहे. मुंबईत पाली हिलमध्ये एक मोठे कार्यालय आहे. त्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. तिला चित्रपट आणि जाहिरातीतून चांगले उत्पन्न मिळते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;