सोलापूर, सांगली, साताऱ्याला अवकाळीचा फटका; सोलापुरात फळबागांचे नुकसान

सोलापूर, सांगली, साताऱ्याला अवकाळीचा फटका; सोलापुरात फळबागांचे नुकसान

वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने मंगळवारी शहर व जिल्ह्याला झोपडले. या अवकाळी पावसामुळे केळी आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. मात्र, उकाडय़ाने हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला. तुफान पावसामुळे शहरात सखल भागांत पावसाचे पाणी साचल्याचे चित्र होते, तर काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर व वस्तीत आल्याने दुर्गंधी पसरली होती. आज सायंकाळी अचानक वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. तब्बल तासभर पावसाने चांगलेच झोपडले. सोलापूर शहरात सखल भागांत पाणी साचले होते. तर मोहोळ, कुर्डूवाडी, वळसंग, अक्कलकोट, माढा, टेंभुर्णीसह जिह्यात जोरदार पाऊस झाला आहे. माढा तालुक्यात केळी व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

जावलीत चौथ्या दिवशीही धुमाकूळ
जावलीत सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. आज विजांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसाने भाजीपाला व शेतपिकांचे मोठे नुकसान केले. रस्त्यावरील झाडेदेखील उन्मळून पडली. वादळी वाऱयामुळे वीज गायब झाली. सर्जापूर, कुडाळ, करहर, केळघर, सायगाव, आणेवाडी, म्हसवे, सरताळे परिसरासह जावली तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. वादळी वाऱयामुळे अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती.

कर्जतमध्ये घरांचे पत्रे उडाले
तालुक्यातील हंडाळवाडी परिसराला गेल्या दोन दिवसांपासून वादळी पावसाचा तडाखा बसत आहे. या पावसाने अनेक घरांची पडझड झाली. वाऱयामुळे अनेकांच्या घरांवरील पत्रे उडून गेले. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा किंवा जीवितहानी झालेली नाही. मात्र, काहीजणांची पाळीव जनावरे जखमी झाली आहेत, तर काहीजणांच्या गोठय़ांचे मोठे नुकसान झाले आहे.

सांगलीतही वादळी पाऊस
शहरासह जिह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव, कडेगाव, विटा, मिरज आणि पलूस तालुक्यांतील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले. ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने दाणादाण उडाली. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने बत्ती गुल झाली होती. दरम्यान, जोरदार पावसाने उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र होते. सांगली शहर परिसरातील मिरज रोडवरील विजयनगर परिसरात गारांचा पाऊस झाला. मिरज तालुक्यातील दूधगाव, कवठेपिरान, समडोळी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील चिंचणी, मांजर्डे, हातनूर, मणेराजुरी, तर विटय़ातील कार्वेसह परिसरात जोरदार पाऊस झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;