सांगली रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट

सांगली रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या दूरध्वनीवर रात्री उशिरा आलेल्या एका कॉलने खळबळ उडवून दिली. समोरच्या व्यक्तीने ‘आम्ही दहशतवादी आहोत. आम्ही पाचजण असून, आमच्याजवळ आरडीएक्स आहे. रेल्वे स्टेशन परिसरात बॉम्ब ठेवून स्टेशन बॉम्बने उडविणार आहोत,’ अशी धमकी दिली. त्यानंतर जिह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली. पोलीस पथके मिरज, सांगली रेल्वे स्थानकावर पोहोचली. पोलिसांनी कसून तपास केला. मात्र, हाती काहीच लागले नाही.

फोनवर धमकी देणाऱ्याने मिरजप्रमाणेच मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या ठिकाणीही त्यांची माणसे पोहोचली असून, तेथेदेखील बॉम्बस्फोट करणार आहोत, असे सांगितले होते. ही बाब गंभीर असल्याने त्याबाबत तत्काळ स्टेशन डायरीत नोंद घेऊन वरिष्ठ अधिकाऱयांना कळविण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने मिरज रेल्वे स्टेशन येथे, तर सांगली रेल्वे स्टेशन येथे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेशनमध्ये तपासणी करण्यात आली.

या धमकीच्या कॉलसंदर्भात सांगली जिह्यामधील सर्व पोलीस ठाण्यांना नियंत्रण कक्षामार्फत संदेश देऊन मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांकडून प्रत्येक संशयित वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. जिह्यातील सर्व ऍम्ब्युलन्स व अग्निशमन यंत्रणेस आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सरकारी व खासगी दवाखान्यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. सांगली व मिरज रेल्वे स्टेशन परिसरात केलेल्या तपासणीमध्ये कोठेही काहीही संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासणी मोहिमेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली व मिरज, प्रभारी अधिकारी सांगली व मिरज उपविभाग, कार्यकारी दंडाधिकारी सांगली व मिरज, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, बॉम्बशोधक-नाशक पथक, दंगलविरोधी पथक, दहशतवादविरोधी पथक व शाखा, वाहतूक शाखा, रेल्वे पोलीस पथक हजर होते. सांगली व मिरज रेल्वे स्टेशन, तसेच जिह्यातील गर्दीची ठिकाणे येथे योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

धमकी देणाऱ्यावर गुन्हा
धमकी देणाऱ्या अनोळखी इसमाविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इसमाचा शोध सुरू आहे. दरम्यान, सांगली पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले असून, कोणतीही संशयित वस्तू अथवा इसम आढळल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा पोलीस दल योग्य ती खबरदारी घेत असून, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;