‘लापता लेडीज’ फेम अभिनेत्रीला सेटवर दिग्दर्शकाकडून शिवीगाळ; आईच्या डोळ्यांत आलं पाणी!
अभिनेता आमिर खानची पूर्व पत्नी किरण रावने तब्बल 13 वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलंय. तिच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेषकरून चित्रपटात फूल कुमारीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नितांशी गोयलचा साधेपणा आणि सहज अभिनय अनेकांना खूप आवडला.
'लापता लेडीज' या चित्रपटामुळे नितांशीच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली आहे. मात्र हा तिचा पहिलाच चित्रपट नाही. याआधी तिने नऊ मालिकांमध्ये काम केलंय. तिचा इथपर्यंतचा प्रवास काही साधासरळ नव्हता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नितांशीने एक वाईट अनुभव सांगितला.
नितांशीने सांगितलं की एका दिग्दर्शकाने तिचा खूप अपमान केला होता. हे पाहून नितांशीची आई खूप रडली होती. "एका मालिकेच्या दिग्दर्शकाला मी पसंत नव्हती आणि त्यामागचं कारण माझं परफॉर्मन्स नव्हतं. मी रातोरात एका मुलीची जागा घेतली होती. ज्या मुलीच्या जागी मला घेतलं गेलं, तिच्याबद्दल मला काहीच माहित नव्हतं", असं तिने सांगितलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List