सोनाली बेंद्रे हिचं अपहरण करणार होता ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू, अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

सोनाली बेंद्रे हिचं अपहरण करणार होता ‘हा’ पाकिस्तानी क्रिकेटपटू, अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. झगमगत्या विश्वात काम करत असताना अभिनेत्रीने अनेक संकटांचा सामना केला आणि स्वतःचे सर्व स्वप्न पूर्ण केले. आज अभिनेत्री पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. एक काळ असा होता जेव्हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने सोनाली हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

एवढंच नाहीतर, सोनाली लग्नाला नकार देत असेल तर, तिचं अपहरण करेल… यावर अनेक वर्षांनंतर सोनाली हिने मौन सोडलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत याबद्दल अभिनेत्रीला विचारण्यात आलं. एकदा शोएब अख्तर म्हणाला होता सोनाली मला खूप आवडते. मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. सोनाली लग्नाला नकार देत असेल तर, तिचं अपहरण करेल… असं देखील शोएब अख्तर याने विनोदी अंदाजात म्हणाला होता…

यावर सोनाली म्हणाली, ‘मला नाही माहिती यामध्ये किती तथ्य आहे. कारण तेव्हा देखील अफवा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. मी माझ्या चाहत्यांचे आभार व्यक्त करते. पण रंगणाऱ्या या सर्व चर्चांमध्ये किती सत्य आहे हे मला माहिती नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

 

सोनाली पुढे म्हणाली, ‘मला क्रिकेट बिलकूल आवडत नाही. पण माझे पती आणि मुलाला क्रिकेट प्रचंड आवडतं. मी कधी क्रिकेट पाहण्यासाठी जात देखील नाही. कारण मला आवडत नाही…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली बेंद्रे हिची चर्चा रंगली आहे..

सोनाली बेंद्रे हिची सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सध्या ‘ब्रोकन न्यूज 2’ सीरिजच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सोनाली सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;