निवडणूक रोखे गैरव्यवहारांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
निवडणूक रोखे योजनेच्या माध्यमातून राजकीय पक्ष, उद्योगसमूह आणि तपास यंत्रणांचे अधिकारी यांच्यात झालेल्या देवाणघेवाणीच्या कथित प्रकारांची कोर्टाच्या देखरेखीखाली एका विशेष तपास पथकाकडून चौकशी व्हावी यासाठी दाखल केलेली जनहित याचिका सुनावणीसाठी घेण्याची विनंती आज दोन स्वयंसेवी संस्थानी सुप्रीम कोर्टाला केली.
’कॉमन कॉज’ आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन यांच्यासाठी अॅड. प्रशांत भूषण यांनी केलेल्या या विनंतीची न्या. संजीव खन्ना आणि दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने दखल घेतली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List