आनंदवार्ता! मान्सून पाच दिवसांत अंदमानात
अचानक सोसाटय़ाच्या वाऱयासह आलेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला, मात्र आज दिवसभर चटके देणारे ऊन आणि अंगातून निघणाऱया घामाच्या धारा असे चित्र होते. त्यात हवामान विभागानेच आनंदाची वर्दी दिली आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 19 मे रोजी अंदमान आणि निकोबार येथे दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
n मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे आले नाहीत तर मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होईल, तर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 8 जूनच्या आसपास होण्याची शक्यता आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List