शहापुरात अवकाळीच्या तडाख्याने 100 घरांची पडझड

शहापुरात अवकाळीच्या तडाख्याने 100 घरांची पडझड

शहापूर तालुक्यात आज सलग दुसऱया दिवशीही अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. वाऱयासह कोसळलेल्या पावसाने तालुक्यातील 100 घरांची पडझड झाल्याने अनेक कुटुंबांचा संसार उघडय़ावर आला आहे. तसेच वीज पडून चार बकऱयांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील आवाळे ग्रामपंचायतीमधील जांभुळपाडा येथे चांदनी त्रिंबक भांगरे यांच्या चार बकऱयांचा वीज पडून मृत्यू झाला आहे, तर दत्ता मोरे, सुरेखा वेखंडे, दत्तू भला, भालचंद्र भगत, पांडुरंग भस्मा, रंजना घाटाळ, केशव पोकळा, रामदास आगिवले, भाऊ दरोडा, बाळू वाघ, अतुल कापटे, बबन तातले यांसह अनेकांच्या घराचे नुकसान झाले. सलग चौथ्या दिवशी आज मोखाडय़ाला अवकाळीने झोडपले. या वादळी पावसासह गारपिटीमुळे काही भागात विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या अवकाळीमुळे डोल्हारा, साखरवाडी, सावर्डे, भोवाडी गावांमधील जवळपास 65 घरांचे नुकसान झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;