होर्डिंगशी उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही

होर्डिंगशी उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही

मुंबईत होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना ही गंभीर आहे. यात उगाच कोणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा या होर्डिंगशी काही संबंध नाही, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी टीकाकारांना सुनावले आहे. मुंबईत सोमवारी घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना झाली. यात चौदा जणांचा मृत्यू झाला, अनेकजण जखमी झाले. होर्डिंग प्रकरणातील भावेश भिंडे याचा उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचा पह्टो ट्विट करून भाजपा आमदार राम कदम यांनी बिनबुडाचे आरोप केले. याबाबत छगन भुजबळ यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता ते संतापले. होर्डिंगशी उद्धव ठाकरे यांचा संबंध काय, असा सवालच त्यांनी केला. धंदेवाईक, व्यावसायिक लोक सर्व ठिकाणी जात असतात, मिठाई, पुष्पगुच्छ देऊन पह्टो काढतात. माझ्याकडे तर कोणीही येतं, त्यांना नाही म्हणू शकत नाही. ते कार्यकर्ते आहेत की नाही हे माहिती नसतं. यात उगाच राजकारण आणण्याचा प्रयत्न कुणी करू नये, असे त्यांनी सुनावले. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱयांवर कडक कारवाई व्हायलाच हवी. शासनाने त्यांच्या वारसांना पाच लाख रुपये दिले म्हणजे सर्व संपलं का, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;