संजय पाटलांनी सोमय्यांची शायनिंग उतरवली
सोमवारी दुर्घटना घडल्यानंतर आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी प्रसारमाध्यमांचा गराडा घेऊन प्रवेश केला. यामुळे बचावकार्यात मोठा अडथळा निर्माण होऊ लागला. याच वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांनी किरीट सोमय्यांची शायनिंग चांगलीच उतरवली. सोमय्या थेट कॅमेऱयासह बचावकार्याच्या ठिकाणी गेल्याने बचावकार्य काही काळ बंदही झाले. यावेळी ‘तुम्हाला घटनास्थळी जायला कुणी सांगितले?, काम करणारी माणसे आहेत ना?, तुम्हाला पॅमेरा घेऊन आत कशाला जायचे आहे?’ असा सवाल करीत संजय दिना पाटील यांनी सोमय्यांना धारेवर धरले. त्यामुळे तंतरलेल्या सोमय्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List