भिंडेवर भाजपचाच वरदहस्त; सुनील राऊत यांनी दिले पुरावे

भिंडेवर भाजपचाच वरदहस्त; सुनील राऊत यांनी दिले पुरावे

भावेश भिंडे, झेंडे की फेंडे त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांना दररोज हजारो लोक भेटायला येत असतात. त्यामुळे एक फोटो सापडला म्हणून त्यावरून राजकारण काय करता, असा सवाल करत या भिंडेवर भाजपचाच वरदहस्त असल्याचे शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी पुराव्यांसह सांगितले. भावेश भिंडेचे भाजपच्या पदाधिकाऱयांसोबत अनेक फोटो आहेत. हे होर्डिंग भाजप-मिंधे सरकारच्या काळातीलच असून भाजपच्या आशीर्वादानेच भिंडेचा व्यवसाय चालला आहे. घाटकोपर प्रकरणी ट्विट करण्याची जी तत्परता भाजपच्या पोपटलालांनी दाखवली ती तत्परता खारघरला पाण्याविना अनेक लोक तडफडून मरण पावले तेव्हा का दाखवली गेली नाही, असा सवाल करताना घाटकोपरच्या दुर्घटनेत जे जे दोषी आढळतील, त्या सर्वांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मृतांच्या नातेवाईकांना न्याय देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे, असे सुनील राऊत यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;