ग्राहक संरक्षण कायदा वकिलांना लागू नाही
सेवेतील कमतरतेबद्दल वकिलांना ग्राहक संरक्षण कायद्याखाली जबाबदार धरता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने आज दिला. सेवेतील कमतरतेबद्दल त्यांना ग्राहक न्यायालयात खेचता येणार नाही, असेही कोर्टाने म्हटले आहे. विधी व्यवसाय हा एकमेवाद्वितीय आहे, येथील कामाचे स्वरूप वैशिष्टय़पूर्ण आहे आणि त्याची तुलना अन्य व्यावसायांशी करता येणार नाही, असे खंडपीठाने सांगितले. वकील आणि त्यांच्या सेवा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कक्षेत येतात, या राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या निवाडय़ाला बार कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली हायकोर्ट बार असोसिएशन आणि बार ऑफ इंडियन लॉयर्स यांनी आव्हान दिले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List