राज्य शिक्षक सेनेने साधला शिक्षकांशी संवाद
राज्य शिक्षक सेनेने लोकसभा आणि आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून शिवसेना शाखांमध्ये तसेच शिक्षकांच्या घरोघरी भेटी देऊन विविध मुद्दय़ांवर शिक्षकांशी चर्चा करण्यात येत आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात येत आहे.
राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक सेनेचे कार्यकर्ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेत जाऊन शिक्षक कार्यकर्ते आणि शिवसैनिकांच्या भेटी घेत आहेत. यावेळी शिक्षक मतदारांशी अनौपचारिक चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नुकतची शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर यांनी शंकर खरवडे यांच्या निवासस्थानी परिसरातील शिक्षक मतदारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी शिक्षकांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांबाबत अभ्यंकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच कांदिवली पश्चिम शिवसेना शाखा क्रमांक 27 येथे उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे, शाखाप्रमुख लहू भोर, संस्थाचालक आदावळे, कांबळे व त्या भागातील उपस्थित शिक्षकांसह अभ्यंकर यांची प्रचार सभादेखील नुकतीच पार पडली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List