26/11च्या हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानात मोकाट, हे भाजपचं अपयश; सचिन सावंत यांची टीका

26/11च्या हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानात मोकाट, हे भाजपचं अपयश; सचिन सावंत यांची टीका

कसाबला फाशी दिली गेली त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते हे उज्ज्वल निकम विसरले आहेत. कसाबच्या विरोधातील वकील म्हणून निकम यांची नियुक्ती काँग्रेस सरकारने केली होती. हे निकम सांगत नाहीत. हा खटला अजूनही प्रलंबित आहे. ’26/11’च्या हल्ल्यातील आरोपी पाकिस्तानात अद्यापही मोकाट आहेत. हे भाजपचे अपयश आहे, अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हल्लाबोल केला.

मुंबईवरील ’26/11″ च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच सिद्ध करू शकलो, असे वक्तव्य उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले आहे. या वक्तव्याचा सचिन सावंत यांनी निषेध केला. 21 नोव्हेंबर 2012 ला कसाबला फाशी दिली गेली त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते हे निकम विसरले असतील. निकम यांची कसाबविरोधात नियुक्ती काँग्रेसच्या सरकारने केली होती हे निकम सांगत नाहीत, पण निकम यांचे कौशल्य कमी पडल्यानेच कसाबबरोबर दोषी असलेले फहीम अन्सारी व सबाउद्दीन शेख हे दोन आरोपी सुटले. ही वस्तुस्थितीही निकम यांनी सांगितली पाहिजे. अजूनही हा खटला प्रलंबित का? याचे उत्तर द्या. पाकिस्तानात अजूनही ’26/11’चे आरोपी मोकाट आहेत असे भारत सरकारने युनोमध्ये सांगितले हे भाजपचे अपयश आहे, अशा शब्दात सचिन सावंत यांनी निकम यांचा समाचार घेतला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;