चित्रपट नसताना सनी लिओनी कशी करतेय करोडोंची कमाई, पाहा काय आहे तिचा बिझनेस

चित्रपट नसताना सनी लिओनी कशी करतेय करोडोंची कमाई, पाहा काय आहे तिचा बिझनेस

अभिनेत्री म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारी सनी लिओनी आता अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. सनीने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयापेक्षा आता तिच्या आयटम साँगचे जास्त लोकं वेडे आहेत. सनी लिओनी फोटोशूटमधूनही बरीच प्रसिद्धी मिळवते. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार, सनी लिओनीची एकूण संपत्ती 115 कोटी रुपये आहे. सध्या ती एकही सिनेमा करत नाहीये. तरी देखील तिच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून.

सनी लिओनी जेव्हा चित्रपटांमध्ये काम करु लागली तेव्हा तिने तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. तिच्या सौदर्याची सगळीकडेच चर्चा झाली. सध्या तिच्याकडे कोणतेही चित्रपट नाही. पण असं असलं तरी तिचं इनकम सुरुच आहे. सनी लिओनीचा स्वतःचा एक कॉस्मेटिक ब्रँड आहे जो सनीने 2016 मध्ये लॉन्च केला होता. अनेक आलिशान आणि महाग उत्पादने आहेत ज्यांना बाजारात मोठी मागणी आहे. सनी येथून चांगली कमाई करते.

व्यावसायिक महिला

सनी लिओनी ही  कपड्यांमध्ये गुंतवणूक करून देखील चांगली कमाई करतेय. तिने 2021 मध्ये कपड्यांच्या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली होती. तिला या व्यवसायातून चांगली कमाई होत आहे. कॉस्मेटिक ब्रँड्सशिवाय सनी लिओनने परफ्यूम व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. अभिनेत्रीने दोन नवीन ब्रँड लॉन्च केले आहेत. तिचा परफ्यूम मार्केटममध्ये वेगाने वाढत आहे आणि या संदर्भात सनी लिओनला तिच्या कमाईमध्ये खूप फायदा होत आहे.

ऑनलाइन गेममध्ये देखील आजमवला हात

एका रिपोर्टनुसार, 2018 मध्ये सनी लिओनीनेही ऑनलाइन गेमच्या जगात प्रवेश केला होता. सनीने एका ऑनलाइन गेम डेव्हलपमेंट कंपनीसोबत करार केला होता. तिने ऑनलाइन गेम बनवण्याचे काम सुरू केले होते, सनीने ऑनलाइन गेममध्येही पाऊल ठेवले आहे. सनी UK IPL फुटबॉल संघाची सहमालक देखील आहे.

सनी केवळ अभिनयातच नाही तर लेखन कौशल्यातही खूप हुशार आहे. 2019 मध्ये, सनीने जुगरनॉट बुक्सचे संस्थापक चिक्की सरकार यांच्या सहकार्याने एक पुस्तक लिहिले आहे. 12 स्वीट ड्रीम्स असे या पुस्तकाचे नाव आहे. ही पुस्तके सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती. या पुस्तकाच्या माध्यमातून पण तिने कमाई केली होती. ती पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिने 2012 मध्ये डिजिटल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आणि स्वतःचा NFT तयार केलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;