शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी – नाना पटोले

शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांनी तत्काळ महाराष्ट्राची माफी मागावी – नाना पटोले

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप चढवून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना मानणाऱ्या करोडो शिवभक्तांचा अपमान केला आहे. या अपमानाबद्दल प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत पण या दैवताचा सातत्याने अपमान केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेकांनी महाराजांचा अपमान केला, पण भारतीय जनता पक्षाने त्यावर चकार शब्द काढला नाही. अयोध्यातील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यातही श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराजांनी नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. असे प्रकार शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आहेत, त्याला आळा घातला पाहिजे पण त्यात भरच पडत आहे.

अंडरवर्ल्ड माफिया दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्चीसोबत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी जमीन व्यवहार केल्याप्रकरणी ईडीकडून चौकशी झाली होती. देशद्रोह्याची संबंध असलेल्या प्रफुल्ल पटेलचे पापी हात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपला लागले हे लाजिरवाणे आहे. या घटनेचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात निषेध करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;