Bomb Threat: दिल्लीतील अनेक रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी

Bomb Threat: दिल्लीतील अनेक रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी

दिल्ली, अहमदाबाद, जयपूरच्या शाळांना बॉम्बने उडविण्याच्या धमकीनंतर आता दिल्लीत रुग्णालयांमध्ये बॉम्बने उडविण्याच्या ईमेलद्वारा धमक्या मिळाल्या आहेत. तर या रुग्णालयांना दुसऱ्यांदा धमकी मिळाली असून पहिला ईमेल रविवारी दुपारी 3 वाजून 4 मिनीटांनी आला होता तर दुसरा मेल सोमवारी रात्री 12 वाजून 19 मिनीट वर मिळाली आहे.

मंगळवारी दिल्ली स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ओपीडीमधील रुग्णांना सुरक्षा तपासणीसाठी बाहेर थांबवण्यात आले आहे. यावेळी तिहार तुरुंगाच्या महासंचालकांना एक मेलही पाठवण्यात आला आहे. खबरदारी म्हणून रूग्णालय परिसरातील संशयास्पद गोष्टींचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा सोमवारी रात्री 12 वाजून 19 मिनीटांनी आली आहे. तर यावेळी दुसऱ्या ईमेल आयडीवरुन ही धमकी मिळालेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या दीप चंद बंधु रूग्णालय, जीटीबी रूग्णालय, दादा देव रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय आदी रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याची धमकीचा ईमेल मिळाला आहे. याप्रकरणी शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. दिल्ली अग्निशमन दलाने ही माहिती दिली. याआधी 12 मे रोजी अनेक रुग्णालयांमध्ये बॉम्बने उडविण्याची धमकी मिळाली होती. याबाबत रुग्णालयांना ईमेल आला होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;