अनिल माझ्यापेक्षा अधिक श्रीमंत असला तरी..; भावाबद्दल संजय कपूरचं वक्तव्य चर्चेत

अनिल माझ्यापेक्षा अधिक श्रीमंत असला तरी..; भावाबद्दल संजय कपूरचं वक्तव्य चर्चेत

बोनी, अनिल आणि संजय कपूर ही तिघं भावंडं गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. या तिघांपैकी बोनी आणि अनिल कपूर यांना करिअरमध्ये चांगलं यश मिळालं. पण संजय कपूरला अपेक्षित असं यश मिळालं नाही. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय कपूर त्याच्या भावंडांसोबतच्या नात्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. अनिल कपूर जरी माझ्यापेक्षा अधिक श्रीमंत असला तरी मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे, असं तो म्हणाला. फिल्म इंडस्ट्रीत एकमेकांशी तुलना नेहमीच केली जाते. पण त्यामुळे भावंडांसोबतच्या नात्यात काही फरक पडला नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं.

या मुलाखतीत संजय म्हणाला, “आम्ही एकत्र राहतो आणि आम्ही ज्या 2BHK रुमपासून सुरूवात केली होती, तिथेच राहतो. आमचं कुटुंब खूप छान आहे. एक वेळी अशी होती जेव्हा मी अनिल किंवा बोनी यांना महिना-दीड महिना भेटायचो नाही. पण तरीही आम्ही एकमेकांचा आदर करतो, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि आम्ही इतके हुशार तर नक्कीच आहोत की हा सगळा चित्रपट निर्मितीचा एक भाग आहे. आज माझ्या घरात भाचे-भाची, पुतणे आहेत. तेसुद्धा त्यांच्या आयुष्यातील चढ-उतारांना सामोरं जातात. पण शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटानुसार आमची नाती बदलत नाही. मग ते अर्जुन असो किंवा सोनम असो किंवा जान्हवी असो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Kapoor (@sanjaykapoor2500)

“इथे स्पर्धा नाही असं मी म्हणणार नाही. पण ही व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे. माझ्या मते अनिल जरी माझ्यापेक्षा अधिक यशस्वी असला तरी मी त्याच्यापेक्षा मी अधिक खुश आणि समाधानी आहे. मग त्यामागचं कारण काहीही असो. देव दयाळू आहे असं मी नेहमीच म्हणतो. जरी मी त्याच्यापेक्षा कमी यश मिळवलं असलं तरी मी आनंदी आहे. मी नेहमीच चांगल्या मूडमध्ये असतो. याचा अर्थ तो सतत दु:खी असतो असं होत नाही. पण ही गोष्ट मी शब्दांत मांडू शकत नाही. पण मी त्याच्यापेक्षा अधिक समाधानी आहे”, असं तो पुढे म्हणाला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;