सलमान खान याच्या एक्स गर्लफ्रेंडचं घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य, ‘जग बदललं आहे, त्यामुळे…’

सलमान खान याच्या एक्स गर्लफ्रेंडचं घटस्फोटाबद्दल मोठं वक्तव्य, ‘जग बदललं आहे, त्यामुळे…’

अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण वयाच्या 58 व्या वर्षी देखील अभिनेत्री एकटात आयुष्य जगत आहे. सांगायचं झालं, सलमान खान याच्या एक्स गर्लफ्रेंड कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता भाईजानची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री सोमी अली हिने वाढणाऱ्या घटस्फोटांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. दरम्यान, अभिनेत्री झीनत अमान यांनी लग्नाआधी तरुणांना लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. यावर सोमी अली हिने झीनत अमान यांचं समर्थन केलं आहे.

सोमी अली म्हणाली, ‘जेव्हा मी विद्याचलमधील माऊंट मेरी येथे राहत होतो, तेव्हा झीनत माझ्या शेजारी होत्या. जॅकी श्रॉफ आणि आयेशाही शेजारी राहत होते. तेव्हा शुटिंगसाठी जात असताना आमची भेट व्हायची. नुकताच झीनत यांना अनेकांनी ट्रोल केलं. कारण त्यांनी लग्नाआधी तरुणांना लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता.’

‘माझा लिव्हइन रिलेशनशिपसाठी विरोध नाही. 100 टक्के मी झीनत यांनी दिलेल्या सल्ल्याचं समर्थन करते. कारण जेव्हा तुम्ही लिव्हइन रिलेशनशिप राहाता तेव्हा तुम्ही एकमेकांना ओळखू लागता. प्रत्येकाची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला आवडणाऱ्या किंवा न आवडणाऱ्या सवयी असू शकतात. तुम्ही एकमेकांच्या आवडी – निवडी जाणून घेऊ शकता…’

‘तरुणांनी लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्नाचा निर्णय घ्यायला हवा. कारण त्यामुळे दिवसागणिक वाढत असलेला घटस्फोटाचा दर कमी होण्यास मदत होऊ शकते. सध्याच्या घडीला भारत, पाकिस्तान आणि अन्य देशांमध्ये घटस्फोटाचा दर वाढत आहे..

‘झीनत उच्च शिक्षित आणि स्पष्ट मत मांडणाऱ्या महिलांपैकी एक आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा नकार करणाऱ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. आपण आता 2024 मध्ये जगत आहोत, 1950 मध्ये नाही. आता जग बदललं आहे. एक महिला लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहू शकते…’ असं देखील सोमी अली म्हणाली.

काय म्हणाल्या होत्या झीनत अमान?

झीनत अमान म्हणाल्या होत्या, ‘माझं वैयक्तिक मत आहे की, जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर मी असा सल्ला देईन की लग्न करण्यापूर्वी तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा. मी माझ्या मुलांनाही हाच सल्ला दिला होचा. तेही लिव्ह इनमध्ये रहात होते / रहात आहेत. तुमचं एकमेकांशी जुळतं का, ताळमेळ आहे का ? या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पण भारतात ‘लिव्ह इन रिलेशनला’ पाप मानले जातं..’ असं देखील झीनत म्हणाल्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;