सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी काय घडलं होतं? मनोज बाजपेयी यांनी सोडलं मौन

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी काय घडलं होतं? मनोज बाजपेयी यांनी सोडलं मौन

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला आजही कोणी विसरु शकलेलं नाही. फक्त चाहतेच नाहीतर, सेलिब्रिटी देखील सुशांत याच्यासोबत असलेल्या आठवणी ताज्या करताना दिसतात. आता प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते मनोज बायपेयी यांनी देखील सुशांत याच्या निधनाबद्दल मोठा खुलासा केला आहे. सुशांत याच्या निधनाच्या 10 दिवस आधी काय झालं होतं? याबद्दल अनेक वर्षांनंतर मनोज यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. मृत्यूच्या 10 दिवसांपूर्वी एक गोष्ट सुशांत याला त्रास देत होती.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मनोज बाजपेयी म्हणाले, ‘सुशांत याला ब्लाइंट आर्टिकल म्हणजे ज्या आर्टिकलमध्ये काहीही तथ्य नसेल अशा आर्टिकलमुळे सुशांत याला त्रास व्हायचा. तो प्रचंड उत्तम व्यक्ती होता. तो मला कायम विचारायचा सर मी काय करु? मी त्याला कायम बोलायचो रंगणाऱ्या चर्चांचा अधिक विचार करु नकोस..’

पुढे मनेज बाजपेयी म्हणाले, ‘ब्लाइंड आर्टिकलमुळे सुशांत याच्यासोबत शेवटचं बोलणं झालं. सुशांत कायम बोलायला सर मला तुम्ही बनवलेलं मटण खायचं आहे. मी त्याला म्हणायचो जेव्हा बनवेल तेव्हा तुला नक्की खाऊ घालेल… त्यानंतर 10 दिवसांत सुशांत याने स्वतःला संपवलं.’

‘आजपर्यंत दोन लोकांच्या निधनाचा मला विश्वास बसत नाही. सुशांत सिंह राजपूत आणि इरफान खान… दोघांचं निधन फार लवकर झालं. दोघांचे दिवस येणार होते…’ असं देखील मनोज बाजपेयी म्हणाले. मनोज बाजपेयी कायम त्यांच्या वक्तव्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असतात.

सुशांत सिंह राजपूत याचं निधन

सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहे. 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे याठिकाणी असलेल्या राहत्या घरात सुशांत याने स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहे. पण तरी देखील अद्याप अभिनेत्याच्या निधनाचं खरं कारण समोर आलं नाही.

सुशांत याची बहीण श्वेता कायम अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल मोठे खुलासे करत असते. सुशांत सिंह राजपूत फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिला. अभिनेत्याच्या निधनानंतर बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची चौकशी करण्यात आली.

सुशांत याच्या निधनानंतर अभिनेत्याची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला देखील अनेक संकटांचा सामना करावा लागला. रिया आणि तिच्या भावाला सुशांत केस प्रकरणी तुरुंगवास भोगावा लागला होता. सुशांत याच्या मृत्यू नंतर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;