एल्गार परिषद प्रकरण; गौतम नवलखा यांना सुप्रीम कोर्टात जामीन मंजुर
एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ता गौतम नवलखा यांना जामीन मंजूर केला आहे.
न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठानं या प्रकरणात नवलखा यांना दिलेल्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने घातलेली स्थगिती वाढवण्यास नकार दिला.
तसेच नवलखा यांना नजरकैदेतील सुरक्षेच्या खर्चासाठी 20 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले.
‘जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाचा आदेश तपशीलवार असल्यानं स्थगिती न वाढवण्याकडे आमचा कल आहे. खटला पूर्ण होण्यासाठी अनेक वर्षे लागतील. वादविवादात न जाता आम्ही स्थगिती वाढवणार नाही. विरुद्ध पक्षाने 20 लाख रुपये लवकरात लवकर भरावेत’, असंही खंडपीठानं सांगितले.
सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं की नवलखा चार वर्षांपासून तुरुंगात आहेत आणि या प्रकरणात आरोप निश्चित करणं बाकी आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी 19 डिसेंबर रोजी नवलखा यांना जामीन मंजूर केला होता परंतु NIAने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर तीन आठवड्यांसाठी त्याच्या आदेशाला स्थगिती दिली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List