‘तारक मेहता..’मधील सोनूचा मिनी स्कर्टमधील लूक पाहून नेटकरी म्हणाले, ‘भिडे मास्तरांना सांगावं लागेल’
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत लहानपणीच्या सोनू भिडेची भूमिका अभिनेत्री निधी भानुशालीने साकारली होती. काही वर्षांपूर्वी निधीने ही मालिका सोडली होती. मात्र सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
निधीला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायला खूप आवडतं. तिने नुकतेच बाली ट्रिपचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये निधीचा बोल्ड अंदाज पहायला मिळतोय. मिनी स्कर्टमधील निधीच्या या लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
निधीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘भिडे मास्तरांची मुलगी बिघडली’ असं एकाने म्हटलंय. तर ‘हमारे जमाने मै..’ असा डायलॉग दुसऱ्या युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिला आहे. मालिकेत सोनूचे वडील आत्माराम भिडे यांचा हा डायलॉग खूप प्रसिद्ध होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List