सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचं कनेक्शन थेट हरियाणापर्यंत

सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचं कनेक्शन थेट हरियाणापर्यंत

अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून सहाव्या आरोपीला हरियाणा येथून अटक करण्यात आली आहे. हरपाल सिंह याच्यावर आरोपींनी रेकी करण्यास मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी हरपाल सिंह याला आज दुपारी 1 वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारानंतर भाईजानचे चाहते देखील चिंता व्यक्त करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीचं नाव मोहम्मद चौधरी असं आहे. आता सहाव्या आरोपीबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचं एक पथक गेल्या चार दिवसांपासून भिरडाना याठिकाणी होतं.

पोलिसांच्या पथकाने मोबाईलच्या दुकानांममध्ये देखील चौकशी केली आणि हरपाल सिंह याबद्दल मोहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची मुंबई क्राइम ब्रँच चौकशी करत होती, त्यात हॅरी उर्फ ​​हरपालचं नाव पुढे आलं होतं.

रिपोर्टनुसार, हॅरी उर्फ ​​हरपाल मोबाईल फोनद्वारे अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींच्या संपर्कात होता. याशिवाय आरोपींसोबत त्याचे व्यवहारही होते. मुंबई क्राइम ब्रँचच्या टीमने आतापर्यंत अटक केलेल्या सहा आरोपींमध्ये दोन शार्प शूटरचाही समावेश आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे सहा आरोपींमधील एका अरोपीने तुरुंगातच स्वतःला संपवलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने सागर पाल, विक्की गुप्ता, अनुज थापन आणि सोनू बिश्नोई यांच्यावर मकोका लावला. या गोळीबार प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा भाऊ अनमोल हे देखील आरोपी आहेत. या दोघांच्या सांगण्यावरून सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये गोळीबार करण्यात आला आणि त्यापूर्वी रेकीही करण्यात आली होती.

गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खान याला जीवेमारण्याची धमकी येत आहे. अनेकदा अभिनेत्याला ईमेलवरून धमकी देण्यात आली. ज्यामुळे अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. शिवाय भाईजान देखील घराबाहेर पडल्यानंतर बुलेट प्रूफ गाडीतून प्रवास करतो. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा रंगत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर चाहते देखील चिंता व्यक्त करताना दिसतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;