तर ‘या’ कारणामुळे धनुष-ऐश्वर्या घेतायत घटस्फोट? प्रसिद्ध गायिकेकडून धक्कादायक खुलासा

तर ‘या’ कारणामुळे धनुष-ऐश्वर्या घेतायत घटस्फोट? प्रसिद्ध गायिकेकडून धक्कादायक खुलासा

जवळपास दोन दशकांच्या संसारानंतर रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याने पती धनुषला घटस्फोट देत असल्याचं दोन वर्षांपूर्वी जाहीर केलं होतं. 2022 मध्ये धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांना धक्का दिला होता. मात्र या दोघांनी घटस्फोटामागील कारण कधीच स्पष्ट केलं नव्हतं. घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केल्यापासूनच दोघं वेगवेगळे राहत आहेत. आता गायिका सुचित्राने या दोघांच्या नात्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुचित्राने धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाविषयी काही खुलासे केले आहेत. धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनी विवाहित असताना एकमेकांची फसवणूक केली, असं तिने म्हटलंय. मात्र आता ऐश्वर्या धनुषवर फसवणुकीचा आरोप करतेय, असंही तिने सांगितलं आहे.

धनुषने मला फसवलं, असा आरोप ऐश्वर्या करतेय. पण तिनेसुद्धा विवाहित असताना धनुषची फसवणूक केली आहे. हा दुटप्पीपणा झाला ना? ऐश्वर्याने धनुषला फसवलं आणि धनुषने ऐश्वर्याला फसवलं. ही एक अशी जोडी आहे, ज्यामध्ये दोघांनीही एकमेकांचा विश्वासघात केला आहे”, असं सुचित्रा म्हणाली. इतके गंभीर आरोप तू कोणत्या आधारावर करतेय, असा प्रश्न विचारला असता तिने सांगितलं की, “ऐश्वर्या आणि धनुष हे विवाहित असताना दुसऱ्या व्यक्तींसोबत डेटवर जायचे. ते बारमध्ये बसायचे आणि ज्या व्यक्तीला डेट करत आहेत, त्यांच्यासोबत मद्यपान करायचे. जेव्हा तुम्ही विवाहित असता, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीसोबत डेटवर जाणं सर्वसामान्य आहे का?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतने 18 नोव्हेंबर 2004 रोजी लग्न केलं होतं. या लग्नसोहळ्याला भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार उपस्थित होते. या दोघांना यात्रा आणि लिंगा ही दोन मुलं आहेत. यात्राचा जन्म 2006 मध्ये तर लिंगाचा जन्म 2010 मध्ये झाला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांनी आजोबा रजनीकांत यांच्यासोबत राहायला पाहिजे, असंही मत सुचित्राने या मुलाखतीत मांडलं.

17 जानेवारी 2022 रोजी धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केला होता. ‘मित्र, जोडीदार आणि पालक म्हणून 18 वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर आमचे मार्ग आता वेगळे होत आहेत. आमच्या या निर्णयाचा आदर करा आणि आम्हाला समजून घ्या’, असं त्यांनी लिहिलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;