सलमान खान गोळीबार प्रकरण; सहाव्या आरोपीला अटक, रेकी केल्याचा आरोप
बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलीसांच्या हाती आता सहावा आरोपी लागला आहे. मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गिरोहच्या आणखी एका सदस्याला अटक करण्यात यश मिळाले आहे. हरपाल सिंह (34) असे त्याचे नाव असून तो हरियाणाच्या फतेहाबाद येथील आहे. सोमवारी त्याला अटक केली आहे.
हरपाल सिंह याला सोमवारी अटक करुन मंगळवारी सकाळी मुंबईला आणण्यात आले. त्याला न्यायालयात उभे केले. गोळीबारच्या घटनेप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली. सलमानच्या वांद्रे येथील घरावर 14 एप्रिलच्या पहाटे गोळीबार करत आरोपींनी पोबारा केला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेला बिश्नोई टोळीचा मोहम्मद रफिक चौधरी याच्या चौकशीत सिंगचे नाव समोर आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, सिंहने चौधरी याला सलमान खानच्या निवासस्थानाभोवती फेरफटका मारण्यास सांगितले होते आणि त्यांना 2-3 लाख रुपयेही दिले होते.
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती कारागृहात असून त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई अमेरिका किंवा कॅनडामध्ये आहे. या प्रकरणात दोघांचीही नावे आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List