लग्नाला यायचं…पण नियम पाळायचे हं! अनोखी निमंत्रण पत्रिका होतेय व्हायरल

लग्नाला यायचं…पण नियम पाळायचे हं! अनोखी निमंत्रण पत्रिका होतेय व्हायरल

लग्नसोहळ्यात पाहुण्यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले जाते. पाहुण्यांमुळे सोहळ्याचा आनंद द्विगुणित होतो. आलेल्या पाहुण्यांची लग्नात खास बडदास्त ठेवली जाते. मात्र एका जोडप्याने लग्नात येणाऱया पाहुण्यांसाठी खास नियमावली तयार केलेय. त्यातले नियम वाचून भलेभलेही चकित झाले आहेत.

लग्नातील पाहुण्यांना खास निमंत्रण पत्रिका पाठवली आहे. यात एक दोन नव्हे तर तब्बल 15 नियम घालून देण्यात आलेत. एकप्रकारची जणू तंबीच देण्यात आलेय. सोशल मीडियावर ही नियमांची पत्रिका जोरदार व्हायरल होत आहे. ती तयार करणाऱया जोडप्याचे नाव समजलेले नाही.

काही नियम याप्रमाणे-
 लग्न तुमचं नाही.
 फोटोग्राफरच्या मार्गात येऊ नका.
 लग्नकार्यात काळ्या किंवा सोनेरी रंगाचे कपडे परिधान करावे. लाल, निळ्या आणि सफेद रंगाचे कपडे अजिबात नको.
 सोहळ्यात खुर्च्यांची अदलाबदल करू नका. सीटिंग अरेंजमेंटमध्ये बदल करू नका. सीटिंग चार्जेस आम्ही काही कारणास्तव आकारले आहेत.
 तुम्ही लग्नात अहेराचे पैसे दिले नसतील, तर तुमच्याकडे जे काही आहे, ते तुमच्याकडेच ठेवा.
 ड्रिंक करताना संयम पाळा.
 बाहेरून दारू आणू नका. तसे करताना पकडला गेलात तर बाहेर काढले जाईल.
 लग्नात कोणतीही मोठी अनाऊंसमेंट होणार नाही.
 लग्नामध्ये संपूर्ण रात्रभर थांबू नये.
 लग्नाचे फोटो पोस्ट करणार असाल तर त्यासाठी कोणता हॅशटॅग द्यायचा हेदेखील सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;