जौनपूर येथे पत्रकाराची गोळ्या घालून हत्या
जौनपूर येथील शाहगंज भागात आशुतोष श्रीवास्तव या 43 वर्षीय पत्रकाराची आज गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास आशुतोष इम्रानगंज मार्पेटकडे चालला असताना अनोळखी हल्लेखोरांनी त्याला गोळ्या घातल्या. त्याने शाहगंज पोलिसांकडे महिनाभरापूर्वी लेखी निवेदनाद्वारे पोलिस संरक्षणाची मागणी केली होती पण, पोलिसांनी दुर्लक्ष केले, असे पुटुंबीयांनी म्हटले आहे. आशुतोषच्या पुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी जौनपूर पत्रकार संघाने केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List