कारवाईची भीती दाखवून महिलेकडून पैसे उकळले

कारवाईची भीती दाखवून महिलेकडून पैसे उकळले

कारवाईची भीती दाखवून ठगाने महिलेकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार महिलेला तीन दिवसांपूर्वी एकाचा पह्न आला. त्याने तो पुरिअर पंपनीमधून बोलत असल्याचे भासवले. त्यावर महिलेने आपण कोणतेही पुरिअर पाठवले नसल्याचे त्याला सांगितले. तुम्ही पाठवलेल्या पुरिअर मध्ये एमडी ड्रग, कपडे आणि व्रेडिट कार्ड आहे, तुम्ही हे पार्सल पाठवले नसेल तर तो फोन सायबर विभागाकडे जोडत असल्याचे त्याने महिलेला सांगितले.

काही वेळाने महिलेला दुसऱया नंबरवरून पह्न आला. सायबर क्राइम झाल्याने तुमची तक्रार नोंदवण्यासाठी एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. ठगाने आयडी दिल्यावर व्हिडीओ का@ल सुरू झाला. समोरून त्या ठगाने पोलीस अधिकारी असल्याचे महिलेला सांगितले. त्या पार्सलमुळे तुमच्या विरोधात गुन्हा नोंद होऊ शकतो अशी भीती घातली. त्यानंतर ठगाने महिलेला वैयक्तिक आणि बँक खात्याची माहिती विचारली. तुमच्या नावाच्या बनावट खात्यात कोटय़वधी रुपये जमा झाले आहेत, त्या पैशाचा वापर अपहारासाठी केल्याचे भासवले. काही वेळाने ठगाने महिलेला एक पत्र पाठवले. त्या पत्रावर सीबीआय असे नमूद होते. मनी लॉण्डरिंगची केस असल्याच्या भूलथापा मारल्या. यातून बाहेर पडायचे असल्यास बँक खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले. कारवाईच्या भीतीने महिलेने 4 लाख 57 हजार रुपये ठगाच्या बँक खात्यात वर्ग केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलीसांत तक्रार केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;