अवघ्या सहा महिन्यांत दुप्पट संख्या, अनुभवी कर्मचारीही ‘एआय’च्या प्रेमात
जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’चा वापर मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. तरुण आणि आता अनुभवी कर्मचारीसुद्धा एआयच्या प्रेमात पडले आहेत. एआयची पॉवर आहे, त्याचा योग्य वापर केला जाऊ शकतो, असे म्हणणाऱयांची संख्या अवघ्या सहा महिन्यांत दुप्पट झाली आहे. अनुभवी कर्मचाऱयांमध्ये 75 टक्के लोकांनी एआयवर विश्वास दाखवला आहे. मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइनच्या वर्क ट्रेंड इंडेक्स 2024 च्या वार्षिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे. बुद्धिमान समजल्या जाणाऱया कर्मचाऱयांनासुद्धा एआयची भुरळ पडली आहे. तेसुद्धा याचा वापर करत आहेत.
– 90 टक्के लोकांना वाटतेय की, एआयमुळे वेळ वाचवण्यात मदत होत आहे. तर 85 टक्के कर्मचाऱयांचे म्हणणे आहे की, एआयमुळे महत्त्वाच्या कार्याकडे डोळसपणे पाहता आले. 84 टक्के लोकांना वाटते की, स्वतःला अपडेट करायला हवे.
– एआय आल्यामुळे नोकऱया गमावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 45 टक्के कर्मचाऱयांना वाटते की, एआयमुळे त्यांची नोकरी धोक्यात येऊ शकते. तर 45 टक्के कर्मचारी चांगल्या नोकरीच्या शोधात असून ते दुसरी नोकरी शोधत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List