पारनेरमध्ये पैशांचा पाऊस, महिलांनी भाजप, मिंधेंच्या पदाधिकाऱ्यांना चोपले

पारनेरमध्ये पैशांचा पाऊस, महिलांनी भाजप, मिंधेंच्या पदाधिकाऱ्यांना चोपले

नगर लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी पारनेर तालुक्यात मतदानाच्या पूर्वसंध्येला पैशांचा पाऊस पाडल्याचा आरोप आहे. मतदारांना पैसेवाटप करून आपल्याकडे वळविण्याचा त्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी झाला. पैसेवाटप करणारे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे आणि मिंधे गटाचे तालुकाप्रमुख विकास ऊर्फ बंडू रोहोकले यांना महिलांनी पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाला असून, जिल्हाभर याची चर्चा सुरू आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना त्यांच्या होमग्राऊंडवर रोखण्यासाठी जंगजंग पछाडलेले भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या हाती काहीही न लागल्याने शेवटी पैशांच्या जोरावर मतदारांना आकर्षित करण्याचा अखेरचा प्रयत्न विखेंनी केला. मात्र, पारनेरच्या जनतेने विखेंचा हा प्रयत्नही हाणून पाडल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. पारनेर तालुक्यातील वडझिरे येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे हे पैसे वाटत असताना लंके समर्थक अनिल गंधाक्ते यांनी त्यास रंगेहाथ पकडले. वाटपासाठी शिंदे यांनी आणलेल्या 500 रुपयांच्या नोटांच्या बंडलांचा रस्त्यावर अक्षरशः पाऊस पडला. या घटनेची माहिती झाल्यानंतर वडझिरे येथील महिलांनी घटनास्थळी जात राहुल शिंदे यास जाब विचारत चांगलाचा चोप दिला. दुसरीकडे रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मिंधे गटाचे तालुकाप्रमुख विकास उर्फ बंडू रोहोकले हा दुर्गम वनपुटय़ात आदिवासी बांधवांना पैसे वाटण्याचा प्रयत्न करीत होते. लंके समर्थकांना त्याची माहिती समजताच रोहोकले यास जाब विचारला. काही महिलांनी त्यास चांगलाच चोप दिला. रेहोकले याने बिनशर्त माघार घेत वनपुटय़ातून निघून जाण्याचे मान्य केल्यांनतर त्यास सोडून देण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;