आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशात हिंसाचार, चौथ्या टप्प्यात देशभरात 64 टक्के मतदान

आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशात हिंसाचार, चौथ्या टप्प्यात देशभरात 64 टक्के मतदान

लोकशाहीच्या सर्वात मोठय़ा उत्सवाच्या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मतदानाला गालबोट लागले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत देशभरात 62.31 टक्के मतदान झाले. 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील तब्बल 96 मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले. काही ठिकाणी पावसामुळे मतदान पेंद्रावर चिखल झाल्याने मतदारांची गैरसोय झाली तर काही ठिकाणी कडक उन्हामुळे मतदारांची गैरसोय झाली. दरम्यान, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या.

मुस्लिम महिलांना मतदार ओळखपत्र विचारले

तेलंगणातील हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार के. माधवी लता यांच्यावर मुस्लिम महिलांना मतदार ओळखपत्राबद्दल विचारणा केली तसेच बुरखा हटवण्यास सांगितल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. माधवी लता यांनी ओळखपत्र आणि संबंधित महिलांचे चेहरे पडताळून पाहिले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱयांनी माधवी लता यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

कुठे किती मतदान

जम्मू आणि कश्मीरमध्ये सर्वात कमी 35.75 टक्के मतदान झाले तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 75.66 टक्के मतदान झाले. आंध्र प्रदेशात 68.04 टक्के, बिहारमध्ये 54.14 टक्के, झारखंडमध्ये 63.14 टक्के, मध्य प्रदेशात 68.01 टक्के, महाराष्ट्रात 52.49 टक्के, ओदिशात 62.96 टक्के, तेलंगणात 61.16 टक्के तर उत्तर प्रदेशात 56.35 टक्के मतदानाची नोंद झाली.

उत्तर प्रदेशात काही गावांमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे तसेच विकासकामे रखडल्याच्या पार्श्वभूमीवर मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला. n पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. त्यामुळे आठ निमलष्करी दलाची पथके तैनात करण्यात आली. विविध राजकीय पक्षांकडून ईव्हीएमशी छेडछाड करण्यात आल्याच्या 1,088 तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या. n पश्चिम बंगालमधील बर्धमान-दुर्गापूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार दिलीप घोष यांच्या ताफ्यावर दोन ठिकाणी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला. n मतदानाच्या पहिल्या काही तासांत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी अनेक ठिकाणी ईव्हीएमशी छेडछाड करण्यात आल्याच्या तक्रारी केल्या. n बिहारमधील मुंगेरमध्ये मतदानापूर्वी एका निवडणूक कर्मचाऱयाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तर मुंगेरमध्येच मतदानादरम्यान स्लिप न दिल्याने काही लोकांनी सुरक्षा कर्मचाऱयांवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून दोघांना ताब्यात घेतले.

आंध्र प्रदेशात टीडीपी आणि वायएसआरसीपीचे कार्यकर्ते भिडले

आंध्र प्रदेशात तेलगू देसम पार्टी, वायएसआर रेड्डी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पलनाडू, कडपा आणि अन्नमाया जिह्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. वायएसआरसीपीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तेलगू देसम पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याची तक्रार केली. टीडीपीच्या नेत्यांनी पाच मतदान पेंद्रे ताब्यात घेतल्याचा आरोप करत वायएसआरसीपीच्या नेत्यांनी या ठिकाणी अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्याची मागणी केली. तसेच निवडणूक अधिकाऱयांनी मतदान पेंद्र क्रमांक 57 या ठिकाणी टीडीपीच्या नेत्यांना घुसण्यास परवानगी दिल्याचा आरोपही वायएसआरसीपीच्या नेत्यांनी केला.

आमदाराने मतदाराच्या कानशिलात लगावली

आंध्र प्रदेशात गुंटूर येथे वायएसआरसीपी पार्टीचे आमदार शिव पुमार यांनी मतदान पेंद्रावर मतदान करण्यासाठी एण्ट्री केली. त्यावेळी रांगेतील मतदाराने त्यांना रांगेत उभे राहून मतदान करण्यासाठी सुचवले. त्यामुळे संतापलेल्या शिव पुमार यांनी मतदाराच्या कानशिलात लगावली. त्यानंतर संतप्त झालेल्या मतदारानेही आमदाराच्या कानाखाली मारली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याप्रकरणी पोलिसांनी शिव पुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी वायआरसीपीचे नेते नंदीगम सुरेश यांच्या गाडीचे नुकसान केल्याचा आरोप वायआरसीपीच्या नेत्यांनी केला

चिरंजीवी, अल्लू अर्जुन, ज्युनियर एनटीआरने केले मतदान

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. अल्लू अर्जुन, चिरंजीवी, ज्युनिअर एनटीआर, महेशबाबू यांनी हैदराबादमध्ये मतदान केले. याशिवाय पवन कल्याण, दिग्दर्शक एस. एस. राजामौली, नागा चैतन्य, तसेच ऑस्कर विजेते संगीतकार एम कीरवानी यांनीही मतदान केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;