‘तारक मेहता..’मधील सोनू भिडेनं गुडघ्यावर बसून बॉयफ्रेंडला केलं प्रपोज, पहा फोटो
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. झीलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती त्याच्या बॉयफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करताना दिसून येत आहे.
झील मेहता ही गेल्या काही काळापासून आदित्य दुबेला डेट करतेय. काही महिन्यांपूर्वीच आदित्यने झीलला सरप्राइज देत प्रपोज केलं होतं. आता झीलने समुद्रकिनारी गुडघ्यावर बसून आदित्यला खास अंदाजात प्रपोज केलं आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
झीलने 2008 मध्ये 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने ही मालिका सोडली. झील तेव्हापासून अभिनयक्षेत्रापासून दूरच आहे. ती सध्या स्टुडंट हाऊसिंग नावाची कंपनी चालवते. तर झीलचा होणारा पती आदित्य हा गेमिंग इंडस्ट्रीत काम करतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List