दिल्ली, अहमदाबादनंतर जयपूरच्या चार शाळांना बॉम्बने उडविण्याचे धमकीचे ईमेल
गेल्या काही दिवसांमध्ये शाळांना बॉम्बने उडविण्याच्या धमकीचे ईमेल येण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता राजस्थानमधील जयपूरच्या चार शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलद्वारे आलेल्या या धमकीने पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना शाळेतून बाहेर काढल्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि श्वानांसह पोलिसांचे पथक शाळांमध्ये पोहोचले. एक पथक ई-मेल पाठवणाऱ्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.
जयपूर पोलीस आयुक्त बीजू जॉर्ज जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूरच्या चार शाळांना बॉम्बने उडविल्याची धमकी दिली आहे. पोलीसांचे शाळेंमध्ये पोहोचली आणि शाळा रिकामी केली. पोलिसांनी सांगितले की, धमकी ईमेलने दिली गेली आणि पोलिसांचे एएक पथक ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञाताने शाळेच्या मुख्याध्यापकांना ईमेल पाठवून शाळेच्या इमारतीत बॉम्ब ठेवण्यात आला आहे. याची सूचना मिळताच शाळेंमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List