नगरमध्ये रात्री पैशांचा पाऊस; भाजपने पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप

नगरमध्ये रात्री पैशांचा पाऊस; भाजपने पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप

बारामतीप्रमाणेच नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री भाजपने पैसे वाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आला आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओची तपासणी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंनी पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. पक्षाच्या एक्सवरही याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.

बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार. भाजपा पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे. पैशाने भरलेली बॅग रस्त्यावर पडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. संबंधित पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा लंकेंच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. नगरमध्ये विखे परिवाराकडून पैशांचा पाऊस पडला आहे.या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर देखील झाला. नगर लोकसभेतील जनता स्वाभिमानी आहे, ती भाजपच्या पैशांच्या मोहाला आणि दमदाटीला बळी पडणार नाही. भाजपला पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे या गोष्टी घडतना दिसत आहे, असेही लंके यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;