स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा

स्टार प्रवाहवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अनेकांची निराशा

छोट्या पडद्यावरील काही मालिका त्यांच्या दमदार कथानक आणि कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडतात. त्यातही काही मालिका 500 आणि हजारो एपिसोड्सचा टप्पा गाठण्यात यशस्वी ठरतात. तर काही मालिकांना लवकरच प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. गेल्या काही काळात छोट्या पडद्यावर बऱ्याच नव्या मालिकांनी जुन्या मालिकांची जागा घेतली आहे. आता अशीच एक लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका असून त्याजागी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे निरोप घेणारी ही मालिका अनेकदा टीआरपीच्या यादीत टॉप 5 मालिकांमध्ये असायची. तरीसुद्धा ती बंद करण्यात येणार असल्याने मालिकेच्या प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लवकरच दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ आणि ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ अशी या दोन मालिकांची नावं आहेत. ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून अभिनेता विशाल निकम पुनरागमन करतोय. त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिका साकारणार आहे. ही मालिका येत्या 27 मेपासून रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. ही मालिका आता रात्री 10 ऐवजी 11 वाजता प्रसारित होणार आहे. सध्या 11 वाजता सुरू असलेली ‘पिंकीचा विजय असो’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

दुसरीकडे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सुर्वे कमबॅक करतेय. ही मालिका येत्या 17 जूनपासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या 9 वाजता प्रसारित होणारी ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे. ही मालिका दोन वर्षांपूर्वी 2022 मध्ये सुरू झाली होती. यामध्ये उर्मिला कोठारे, अभिजीत खांडकेकर, प्रिया मराठे, अवनी तायवाडे यांनी भूमिका साकारल्या आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;